LIVE UPDATES

कॅनडामध्ये विमान कोसळलं

अपघातात मुंबईतील दोन पायलटचा मृत्यू
Edited by:
Published on: October 07, 2023 16:56 PM
views 627  views

कॅनडामध्ये विमान कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात मुंबईतील दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, विमान परिसरातील एका झाडावर आदळल्यानंतर अपघात झाला. कॅनडातील व‌‌ँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानामध्ये मुंबईचे दोन शिकाऊ पायलट होते, त्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या दोघांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे

अपघाताच नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अपघातग्रस्त विमान वजनानं हलकं होतं. ते झाडावर आदळल्यानं कोसळलं. अपघातानंतर क‌ॅनडाच्या परिवहन सुरक्षा बोर्डाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांच्याकडून अपघाताच्या कारणांचा शोध सुरू आहे. पाच रुग्णवाहिका आणि एक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. परिसरातील कोणालाही इजा झालेली नाही. घटनास्थळी दोन हवाई रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या होत्या. पण नंतर त्यांना माघारी बोलावण्यात आलं.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026