LIVE UPDATES

स्वतंत्र भारतामधील पहिले मतदार शाम नेगी यांचे निधन

वयाच्या १०६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास तीन दिवसांपूर्वीच केलं होतं शेवटचं मतदान
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: November 05, 2022 15:58 PM
views 565  views

किन्नौर : स्वतंत्र भारतामधील पहिले मतदार म्हणून ओळख असणारे श्याम शरण नेगी यांचे शनिवार दिनांक ५  नोव्हेंबर रोजी सकाळी निधन झाले. हिमाचल प्रदेशमधील किन्नौरचे रहिवासी असणारे नेगी १०६ वर्षांचे होते. त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी २ नोव्हेंबर रोजी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावला होता. नेगी यांच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्हाप्रशासनाकडून शासकीय व्यवस्था केली जात असल्याची माहिती किन्नौरचे जिल्हाधिकारी आबिद हुसैन यांनी दिली आहे.

श्याम शरण नेगी हे नुकतेच निवडणूक अधिकाऱ्याला १२-डी फॉर्म परत करून चर्चेत आले होते. त्यांनी मी मतदान केंद्रावरच जाऊन मतदान करणार असल्याचे सांगत फॉर्म परत पाठवला होता. मात्र नंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि निवडणुक अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे पोस्टल मत घेतले.

किन्नोर येथे पहिले मतदान २५ ऑक्टोबर १९५१ मध्ये झाले होते. तेव्हा नेगी यांची देशातील पहिला मतदार म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी मंडी-महासू (मंडी) या क्षेत्रासाठी मतदान केले होते. निवडणूक आयोगाने १९५२ च्या जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात पहिल्या निवडणुका होतील, असे जाहीर केले होते. मात्र, काही कारणांनी हिमाचल प्रदेशच्या किन्नोरमध्ये त्याआधीच निवडणूका घेण्यात आल्या. नेगी यांनी त्यावेळी किन्नोर येथील मतदान केंद्राचे अधिकारी म्हणून भूमिका बजावली होती.

किन्नोर हा अतिशय दुर्गम भाग होता. त्यातही पहिल्यांदाच मतदान असल्याने मतदानाला कोणीच उपस्थित राहिले नव्हते. त्यावेळी नेगी यांनी स्वतःच आपले मतदान केले आणि ते देशाचे पहिले मतदार ठरले. विशेष म्हणजे त्यानंतर नेगी यांनी लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. तब्बल एक महिना या परिसरात फिरून त्यांनी लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिली. नेगी यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेकदा गौरवण्यात आले होते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026