LIVE UPDATES

एकाच दिवशी तब्बल 92 खासदारांचा 'कार्यक्रम' !

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 19, 2023 10:55 AM
views 789  views

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोठा गदारोळ झाला आहे.  तब्बल 92 खासदारांचे निलंबन करण्यात आले. संसदेतील ही रेकॉर्ड ब्रेक कारवाई असल्याचे बोलले जात आहे. सभागृहात गोंधळ घातल्याचा आरोप करत लोकसभेतील 31 विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह डीएमके नेता टीआर बालू  यांचाही समावेश आहे. तर राज्यसभेतील एक विरोधी खासदारलाही गदारोळाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. सभापतींची ही कृती म्हणजे हुकूमशाही असल्याचा हल्लाबोल निलंबीत खासदारांनी केला आहे.

विरोधी पक्षातील तब्बल 92 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. यात लोकसभेतील 47 आणि राज्यसभेतील 45 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरींसह आज 33 खासदारांना निलंबित करण्यात आलं. तर त्याआधी 14 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. संसदेत घुसखोरी झाल्यानंतर विरोधक खासदारांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे ही निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

संसदेच्या सुरक्षा मुद्द्याबाबत बोलताना गोंधळ घातल्याबद्दल शुक्रवारी लोकसभा अध्यक्षांनी 13 खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले होते. या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी सोमवारी लोकसभेत गदारोळ घातला. लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांनी संसदेच्या पाय-यांवर बसून आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी खासदारांशी चर्चा करून संसदेत प्रवेश केला. निलंबनाविरोधात या खासदारांनी प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. निलंबित खासदारांची शिक्षा आणि गृहमंत्री अमित शहा यांचे लोकसभेतील वक्तव्य बंद करण्याची मागणी हे खासदार करत होते. सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना अनेक वेळा या खासदारांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र सभागृहात गोंधळ सुरूच होता.

सभागृहात गोंधळ सुरु असताना  संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मोठी कारवाई केली. गोंधळ घालणाऱ्या सर्व खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी सभागृहातून निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. या अपीलावर सभापती ओम बिर्ला यांनी अधीर रंजन चौधरी आणि टीआर बालू यांच्यासह 33 विरोधी खासदारांना लोकसभेतून निलंबित केले आहे. आधीचे 13 आणि आत्ताचे 33 असे मिळून लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या आता 46 वर पोहचली आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026