LIVE UPDATES

सिलेंडर झाला स्वस्त !

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 22, 2023 13:51 PM
views 1986  views

नवी दिल्ली : नव्या वर्षात अर्थात 2024 या वर्षात देशातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह आहेत. राजकीय उलथापालथही होण्याची शक्यता आहे. अनेक मोठी नावं येत्या काळात सत्ताधारी भाजपच्या बाजूनं जाऊ शकतात असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. या साऱ्यामध्येच आता आगामी निवडणुकांच्या आधीपासूनच सरकारनं मोर्चेबांधणी सुरु केली असून प्रत्येक क्षेत्राच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय घेत नागरिकांवर आणि परिणामी मतदारांवर प्रभाव पाडण्याचं काम सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचा एक भाग म्हणजे सरकानं घेतलेला गॅस दरातील कपातीचा निर्णय. नव्या वर्षाआधीच सरकारच्यावतीनं 19 किलोग्राम वजनाच्या व्यावसायिक वापरातील गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहेत. 39 रुपयांनी हे दर कमी करण्यात आले असल्यामुळं आता देशाच्या विविध शहरांमध्ये व्यावसायिक वापरातील एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. असं असलं तरीही घरगुती वापरातील सिलेंडरचे दर मात्र स्थिर असून त्यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी.


एलपीजीच्या दरात कपातीचा निर्णय घेतल्यानंतर आता 39 रुपये कमी होताच व्यावसायित गॅस सिलिंडरचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या एका सिलेंडरसाठी 1710 रुपये, दिल्लीमध्ये 1757.50 रुपये, कोलकातामध्ये 1869 रुपये आणि चेन्नईमध्ये 1929.50 रुपये मोजले जात आहेत. नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागताआधी मिळालेल्या या सवलतीमुळं आता अनेकांनाच याचा फायदा होणार आहे. याआधी 1 डिसेंबरलाही इंधन कंपन्यांनी 19 किलोग्राम वजनाच्या सिलेंडरच्या दरात बदल करून 21 रुपयांची वाढ केली होती. त्याआधी म्हणजे 16 नोव्हेंबरला हे दर 57 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतला असता व्यावसायिक वापरातील गॅसचे दर स्थिर नसून त्यामध्ये सातत्यानं बदल होताना दिसत आहेत. एकिकडे व्यावसायिक वापरातील सिलेंडरच्या दरात चढ -उतार पाहायला मिळत असतानाच घरगुती वापरातील सिलेंडरच्या किमती मात्र कैक दिवसांपासून स्थिर आहेत. 30 ऑगस्ट 2023 ला घरगुती सिलेंडरचे दर 200 रुपयांनी कमी करण्तयात आले होते. ज्यानंतर मुंबईत त्यासाठी 902.50 रुपये, दिल्लीमध्ये 903 रुपये आणि कोलकात्यामध्ये 929 रुपये इतकी किंमत मोजावी लागत आहे.



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026