LIVE UPDATES

भारतीय जवानांनी उधळला डाव

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 23, 2023 12:56 PM
views 697  views

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून आलेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केला. जिगरबाज भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा हा डाव उधळून लावला. अखनूर सेक्टरमध्ये चार दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत गोळीबार केला. त्यात एका दहशतवादी मारला गेला. त्याचा मृतदेह इतर साथीदार दहशतवाद्यांनी सीमापार फरफटत नेल्याचे दिसून आले, अशी माहिती देण्यात आली. याचवेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षादलाच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. एका दहशतवाद्याचा खात्मा केला. त्याचा मृतदेह सीमापार फरफटत नेत इतर तीन साथीदार दहशतवाद्यांनी पळ काढला.भारतीय लष्कराच्या 'व्हाइट नाइट कोर'ने एक्स अकाउंटवरून या घटनेची माहिती दिली. खौर, अखनूरच्या आयबी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. २२ आणि २३ डिसेंबरच्या मध्यरात्री सीमेवर चार दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली पाळत ठेवणाऱ्या उपकरणांच्या माध्यमातून टिपण्यात आल्या.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026